गुन्हेगारांच्या टोळ्यांवर नियंत्रणासाठी धडपड

मोठा ताजबाग वस्तीत युवकांची चौकशी करताना बिट इंचार्ज पोलिस अधिकारी व कर्मचारी.
मोठा ताजबाग वस्तीत युवकांची चौकशी करताना बिट इंचार्ज पोलिस अधिकारी व कर्मचारी.

नागपूर - गुंडांची टोळीयुद्धे व कुख्यात गुंडाचा ठिय्या सक्‍करदऱ्यात आहे. ताजबाग ही वस्ती असल्यामुळे पोलिसांना विशेष गस्त आणि बंदोबस्तावर नेहमी भर द्यावा लागतो. सक्‍करदऱ्यात दोन आठवडीबाजार, वसतिगृह व बरेच शासकीय कार्यालये आहेत. भांडेप्लॉट झोपडपट्टी, सौजारी मोहल्ला झोपडपट्टी, राणी भोसलेनगर झोपडपट्टी आणि सिंधीबन झोपडपट्टी असल्यामुळे गुन्हेगारी वाढलेली होती. मात्र, बिट सिस्टीममुळे ताजबाग व झोपडपट्टींमध्ये पोलिसांचा जनसंपर्क वाढला. गस्त आणि पोलिसमित्रांची संख्या बरीच मोठी आहे. पोलिसांना युवकांकडून सहकार्य मिळत असल्यामुळे सध्या येथील गुन्हेगारीवर अंकुश आहे.

१३२ पोलिस अधिकारी, कर्मचारी
सक्‍करदरा पोलिस ठाण्याची स्थापना १९८३ साली झाली. ठाणेदार म्हणून आनंद नेर्लेकर यांच्याकडे पदभार आहे. ठाण्यात १३२ पोलिस अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यामध्ये ४ सहायक निरीक्षक, तर १२ पोलिस उपनिरीक्षक आहेत. हद्दीत आठ गार्डन आहेत. सर्वाधिक ट्यूशन क्‍लासेस आणि ताजबाग असल्याने पोलिस बंदोबस्तावर भर द्यावा लागतो.

पोलिसांसमोरील समस्या
सक्‍करदऱ्यामध्ये कुख्यात गुंड राजा गौस, राजू बद्रे, वसीम राजा व आबू यांच्या टोळ्या आहेत. यांच्यात टोळीयुद्धे होत असून, त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. आठवडीबाजारात गुंडांकडून वसुली अजूनही सुरू आहे. यातून एका गुंडाचा गेल्या वर्षी खूनही झाला. ठाण्यातून १८ तडीपार, तर सहा जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहेत. ट्युशन क्‍लासेसमुळे पार्किंगची समस्या असून, ‘ट्रॅफिक जॅम’ होणे ही नेहमीचीच समस्या आहे. विद्यार्थिनींची छेडखानी, वाहनचोरी, लूटमार, अतिक्रमण या समस्या पोलिसांसमोर आहे.

ताजबागमध्ये मोहल्ला मीटिंग घेण्यात येते व गस्त वाढविण्यात आली आहे. गुन्हेगार दत्तक योजना राबविण्यात आली असून, त्यांच्यावर वॉच ठेवण्यात येते. ज्येष्ठ नागरिक व महिला समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. कोम्बिंग ऑपरेशन तसेच नाकाबंदी नेहमी केल्या जाते.
- आनंद नेर्लेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
मो. ९९२२००१७८५

रेशीमबाग बिट
इन्चार्ज- गणेश फुलकवर (सहायक पोलिस निरीक्षक)
मो. ९४०४१८२३७१
एकूण कर्मचारी - १२
लोकसंख्या -  ७० हजार
गुन्हेगार - ३
बिटच्या सीमा
आवारी चौक ते भांडे प्लॉट चौक, मंगलमूर्ती लॉन ते त्रिरंगा चौक, गजानन चौक ते केशवद्वार चौक.

महत्त्वाची ठिकाणे
ओमनगर, आनंदनगर, नेहरूनगर, सुदामपुरी, रेशीमबाग, भांडे प्लॉट, कबीरनगर.

बुधवारी बाजार बिट
इंचार्ज - सतीश डेहनकर (सहायक पोलिस निरीक्षक)
मो. ९०४९१४८८७५
कर्मचारी - १४
गुन्हेगार - ११
लोकसंख्या - ८० हजार
बिटच्या सीमा
सक्‍करदरा चौक ते रेशीमबाग चौक, क्रीडा चौक ते तुकडोजी पुतळा, महाकाळकर भवन ते संजुबा शाळा चौक ते भांडे प्लॉट चौक.
प्रमुख ठिकाणे
सोमवारी क्‍वॉटर्स, रघुजीनगर, एनआयटी कॉम्प्लेक्‍स, आयुर्वेदिक ले-आउट, सूर्वे ले-आउट, छोटा ताजबाग, कामगारकल्याण भवन, ईएसआयसी हॉस्पिटल, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, बुधवारी बाजार, मिर्ची बाजार, आयुर्वेदिक ले-आउट.

दत्तात्रयनगर बिट
इंचार्ज - दिलीप चंदन, सहायक पोलिस निरीक्षक
मो. ९९२२४८६२००
कर्मचारी - १४
गुन्हेगार - २६
लोकसंख्या - ८० हजार
बिटच्या सीमा
संजुबा शाळा चौक ते महाकाळकर सभागृह, बिडीपेठ ते बसवेश्‍वर पुतळा, म्हाळगीनगर ते बेसा पॉवर हाउस टी पॉइंट, शहनशहा चौक ते हुसैनबाबा दर्गा ते फायर ब्रिगेड कार्यालय चौक.
प्रमुख ठिकाणे
दत्तात्रय झोपडपट्टी, आदिवासीनगर, बिडीपेठ, राणी सती झोपडपट्टी, शहनशहा चौक, न्यू सुभेदार ले-आउट, 
तुकोबा ग्राम.

मोठा ताजबाग बिट
इंचार्ज - केशव ठाकरे, सहायक पोलिस निरीक्षक
मो. ९८८१००३९९३
कर्मचारी - १५
गुन्हेगार - २५
लोकसंख्या - दोन लाख
बिटच्या सीमा
भांडे प्लॉट चौक ते चामट चक्‍की चौक, बेसा पॉवर हाउस टी पॉइंट ते शहनशहा चौक, बिडीपेठ ते शनिमंदिर चौक, हुसैनशहा बाबा दर्गा ते मोठा ताजबाग, गौसीया कॉलनी ते आझाद कॉलनी, यासीन प्लॉट ते बहादुरा.
प्रमुख ठिकाणे
मोठा ताजबाग, भांडे प्लॉट, जुना सक्‍करदरा, गवंडीपुरा, गौसीया कॉलनी, यासीन प्लॉट, सिंधीबननगर, महेशनगर, सौंजारी मोहल्ला, राणी भोसलेनगर, सेवादलनगर, आझाद कॉलनी, सरताज कॉलनी, बाराखोली आणि बहादुरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com