खेळण्यातील पिस्तूल, बसला पब्लिक मार अन्‌ झाला गजाआड

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 September 2019

नागपूर : पिस्तूल घेऊल लुटारू अचानक लॉटरी सेंटरमध्ये शिरला. उपस्थितांना धाक दाखविला. पैशाची मागणी केली. त्याचा हा बनाव वेळीच लोकांच्या लक्षात आला. पिस्तूलही खेळण्यातील असल्याचे उपस्थितांनी ओळखले. मग काय, त्याला पकडून पब्लिक मार देण्यात आला. संधी मिळेल त्याने हात साफ केला. सरते शेवटी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

एखाद्या हास्यपटातील विनोदवीरांनी साकारलेला हा प्रसंग नाही, तर उपराजधानीत घडलेली खरीखुरी घटना आहे. बुधवारी रात्री तुकडोजी चौकात ही घटना घडली. इकशमुद्दीन निर मोईयुद्दीन सय्यद असे गजाआड झालेल्या लुटारूचे नाव आहे. 29 वर्षीय इकशमुद्दीन मोठा ताजबाग परिसरातील दिल्लीवाली अम्माच्या दर्गाजवळ राहतो. बुधवारी रात्री 9.30 वाजता तो तुकडोजी पुतळा चौकातील संजय ऑनलाइन लॉटरी सेंटरमध्ये शिरला. सतीश नांदूरकर (35) हा आतच बसला होता. आरोपीने कंबरेत लपविलेले पिस्तूल अचानक बाहेर काढले. अगदी थरारपटातील प्रसंगानुसार त्याने पैसे ताब्यात देण्याचे फरमान सोडले. गल्ल्यातील पैसे लुटण्याचा प्रयत्न सुरू केला. या प्रकाराने सतीश घाबरला. त्याने काहीसा विरोधही केला. थोड्याच वेळात आरोपी सराईत लुटारू नसल्याचे सतीशच्या लक्षात आले. पिस्तूलही नकली असल्याचे लक्षात यायला वेळ लागला नाही. यानंतर सतीशने इतरांच्या मदतीने आरोपीला पकडून त्याचा खरपूस समाचार घेतला. यानंतर घटनेची माहिती अजनी पोलिसांना देऊन आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. बुधवारी दिवसभर या घटनेची खमंग चर्चा परिसरात होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criminal with a toy pistol