
नागपूर : केंद्र शासनाद्वारे ‘सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम-२०२५’ ला १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागपूर विभागातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी केले आहे.