पीककर्ज वाटप व पुनर्गठन सप्टेंबरनंतरही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

नागपूर : 30 सप्टेंबर पूर्वी पीककर्ज वाटप व कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्याचे व त्या सर्वांना नव्याने पीककर्ज वाटप करण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व सरकारी बॅंकांना दिल्याची माहिती शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी दिली आहे.

तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार राज्यात निवडणूक आचारसंहिता असल्याचे सांगून महाराष्ट्र बॅंक, विदर्भ कोकण ग्रामीण बॅंका पीककर्ज वाटप व कर्जाचे पुनर्गठन बंद झाल्याचे सांगत आहे व शेतकऱ्यांना परत पाठवीत आहे. तशा तक्रारी मराठवाड्यातून व पश्‍चिम विदर्भातून येत असल्यामुळे ही बाब शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे हा विषय उपस्थित केला असता त्यांनी सप्टेंबरनंतरही पीककर्ज वाटप व पुनर्गठन करण्याच्या सूचना बॅंकांना करण्याचे मान्य केले.
याउपरही ज्या बॅंका वरून आदेश आले नाहीत असा कांगावा करतील त्यांना शिवसैनिकांनी आपल्या रीतीने समजावून सांगावे व अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहनही तिवारी यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crop loan allocation and restructuring even after September