अतिपावसाने पिके पडली पिवळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

मेंढला (जि.नागपूर) : सततच्या पावसामुळे कापसाची बोंडे सडत असून पात्या व फुले गळत आहेत. तसेच सोयाबीनच्या शेंगामध्ये अंकुर निघाले आहेत. यामुळे पिके पिवळी पडली असून कपाशीला धोका निर्माण झाला आहे.
मेंढला परिसरात कपाशीचा सर्वाधिक पेरा असून पाऊस नियमित येत असल्यामुळे फवारणी, खते, निंदण व खुरपणीची कामे रखडली आहेत. 

   बोंडे परिपक्व होण्याच्या अवस्थेत होती. ज्वारी, उडीद, भुईमूग, मूग व भाजीपाला पिकापैकी मक्का व ज्वारीच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिके समाधानकारक नसल्याची स्थिती पाहावयास मिळते. भुईमुगाच्या शेंगा भरल्या नाहीत. वन्यप्राण्यांचा हैदोस असल्याने उडीद, मूग, भाजीपाला अतिपावसाने सडत आहे. आंतरमशागतीची कामे रखडली आहेत. कर्ज काढून पैसे शेतीत खर्च केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांचे उत्पन्न हातात पडेल, याची शाश्‍वती नसल्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. पावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून मजूर रिकामे आहेत. अति पावसामुळे यावर्षी पिकांचे उत्पादन कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
मेंढला सर्कलमध्ये यंदा खूप पाऊस झाला आहे. पिके पूर्णतः खराब झालेली आहेत. वन्यप्राणीसुद्धा पिकांचे नुकसान करीत आहे. अशावेळी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
दिलेश ठाकरे
सामाजिक कार्यकर्ते
मेंढला
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The crops became yellow due to excess rainfall