
गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त लाखो भाविक शेगावमध्ये दर्शनासाठी येतात. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर धार्मिक स्थळांवरील गर्दी नियंत्रणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना, शेगावच्या गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापन देशभरासाठी आदर्श ठरू शकते. योग्य नियोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे येथे कधीही अशा दुर्घटना घडत नाहीत, त्यामुळे हे मॉडेल इतर धार्मिक स्थळांसाठी मार्गदर्शक ठरू शकते.