esakal | नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान; सर्वेक्षण कासवगतीने | Natural Disaster
sakal

बोलून बातमी शोधा

farmer loss

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान; सर्वेक्षण कासवगतीने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती - नैसर्गिक आपत्ती अंतर्गत अमरावती विभागातील पीकविमा योजनेचे केवळ ३५ टक्केच सर्वेक्षण झाले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना विमा परतावा कधी मिळेल, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अकोला व अमरावती या दोन जिल्ह्यांतील टक्केवारी चांगली असली तरी बुलडाणा, वाशीम व यवतमाळ येथील सर्वेक्षणाची टक्केवारी चिंताजनक आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अमरावती विभागात एकूण १९ लाख १३ हजार १७८ शेतकरी आहेत. त्यापैकी १२ लाख ९९ हजार ७०२ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. अतिवृष्टी व संततधार पावसामुळे नुकसान झाल्याची सूचना ७२ तासांत ३ लाख ७० हजार ४१५ शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. या सूचनांच्या अनुषंगाने विमा कंपनीने १ लाख २७ हजार ८९२ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले आहे. तब्बल २ लाख ४२ हजार ५२३ शेतकऱ्यांच्या सूचनांवर अजूनही कंपनीने सर्वेक्षण केलेले नाही. विभागातील सर्वेक्षणाची सरासरी फक्त ३५ टक्के इतकी दयनीय आहे.

हेही वाचा: सामान्यांच्या ताटातून भाजी गायब; दर दुप्पटीने वाढले

परतावा देण्यासाठी कंपनीच्या कामाची गती सर्वेक्षणाच्या सरासरीवरून दिसून येते. या गतीने बाधित शेतकऱ्यांना विमा परतावा कधी मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळीपूर्वी परतावे मिळावे, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र कृषी विभाग व कंपनीचा कारभार बघता, ती शक्यता फारच कमी आहे.

जिल्हानिहाय स्थिती

जिल्हा प्राप्त पूर्वसूचना सर्वेक्षण टक्केवारी

बुलडाणा ११७८३४ १२९८४ ११

अकोला ५५८४४ ५२२०० ९३

वाशीम ९०२९० १६८३६ १९

अमरावती २५१६० २०४५८ ८१

यवतमाळ ८१२८७ २५४१४ ३१

-----------------------------------------------------------------------

३,७०, ४१५ १,२७८९२ ३५

loading image
go to top