esakal | दोन चिमुकल्यांच्या डोळ्यातील अंधार दूर
sakal

बोलून बातमी शोधा

ओंकार आणि अद्वैत

दोन चिमुकल्यांच्या डोळ्यातील अंधार दूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : नाव ओंकार पांडे व अद्वैत बारापात्रे. वय अवघे दोन ते तीन महिन्यांचे. मोतीबिंदूमुळे काळोख दाटलेला. चिमुकल्यांच्या वेदना बघून पालकांच्या डोळ्यांत पाणी येत होते. पालकांचे अश्रू पुसण्याचे काम माधव नेत्रालयात झाले. दोन्ही चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अंधार दूर करण्यात नेत्ररोगतज्ज्ञांना यश आले.नेत्ररोग संघटनेच्या अभ्यासानुसार गर्भवतीचे कुपोषण, गर्भवती असताना घेतलेला औषधांचा अतिरेक, प्रसूतीदरम्यान संसर्ग तसेच अतिरक्तस्त्राव झाल्यास बाळाला मोतीबिंदू होण्याची जोखीम असते. दहा हजार बालकांपैकी 10 बालकांमध्ये जन्मजात मोतीबिंदू आढळतो. मेडिकलमध्ये वर्षभरात 1 ते 2 महिन्यांच्या 10 ते 12 मुलांमध्ये मोतीबिंदू आढळला. माधव नेत्रालयात चार दिवसांत दोन बालकांवर या पद्धतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या. नेत्रदान पंधरवड्याच्या पर्वावर या चिमुकल्यांना दृष्टी मिळाली, हे विशेष. प्रदूषण व इतर कारणांमुळे हल्ली लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत डोळ्याचे आजार डोकं वर काढत आहेत.
गर्भातील बाळाचे पोषण व्हावे यासाठी आईला आवश्‍यक घटक असलेले अन्नपदार्थ खायला द्यावे. जेणेकरून बाळ कुपोषित होणार नाही. कुपोषित राहिल्यास बाळावर सहज परिणाम होतो. महिलेल्या आहारावर विशेष लक्ष दिल्यास बाळाला जन्मत: मोतीबिंदू होण्याची जोखीम कमी होई शकते.
- डॉ. अशोक मदान,विभागप्रमुख, नेत्ररोग विभाग, मेडिकल.

loading image
go to top