Chandrapur News: शेतकऱ्याने डिझेल टाकून स्वतःला पेटविले; दरुर येथील घटना, उपचारासाठी नेत असताना झाला मृत्यू
Heavy Rain Damage: अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर दरूर येथील शेतकरी नामदेव सोनटक्के यांनी डिझेल टाकून आत्मदहन केल्याची धक्कादायक घटना घडली. नागपूरला उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला असून गावात शोककळा पसरली आहे.
गोंडपिपरी : यंदा मोठया प्रमाणावर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. अशातच गोंडपिपरी तालुक्यातील दरूर गावातील एका युवा शेतकऱ्याने आपल्या अंगावर डिझेल टाकीत स्वतः ला पेटवून घेतले.