file photo
file photo

दारव्हा-यवतमाळ मार्गाच्या साइडशोल्डरची धूळधाण

दारव्हा (जि. यवतमाळ) : ठेकेदाराने शासकीय परिपत्रकाचा अवास्तव फायदा घेत दारव्हा-यवतमाळ मार्गालगत नाली खोदून केबल टाकण्याचे काम सुरू केले. परिणामी मार्गाच्या साइडशोल्डरची धुळधाण होऊन मार्ग धोकादायक बनला आहे. खोदकामातून झाडांची मुळे कमकुवत झालेले वृक्ष चालत्या वाहनांवर कोसळण्याच्या दोन घटनांत एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झालेत.
महानेट प्रकल्पासाठी दारव्हा-यवतमाळ राज्य मार्गालगत खोदकाम करून केबल टाकण्याचे काम एका कंपनीला मिळाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सध्या केबल टाकण्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराने शासकीय परिपत्रकाचा अवास्तव फायदा घेत दारव्हा-यवतमाळ राज्य महामार्गालगत खोदकाम करून या मार्गाच्या साइड शोल्डरचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून मार्ग धोकादायक केला आहे, तर बुंध्यालागत खोदकाम केल्याने अनेक झाडांची मुळे कमकुवत झाली. त्यामुळे या मार्गावरील हिरवी झाडे अचानक कोसळणाच्या घटना घडत आहेत. मार्गाच्या मध्यापासून 14 मीटरच्या आत राज्यमार्गावर खोदकाम करता येत नाही. प्रत्यक्षात मार्गाच्या मध्यापासून सहा ते सात मीटरवरच नाली काम सुरू आहे. निघणारी माती दोन्ही बाजूला टाकल्याने पावसाचे पाणी मार्गावरून खाली उतरण्याला अडचणी येत असून, दुसरीकडे काही पाणी नालीत शिरल्याने साइड शोल्डरचा भाग नरम होत आहे. केबल टाकल्यानंतर मुरूम टाकून नाली बुजविण्याची जबाबदारी असताना मातीच्याच साह्याने नाली बुजविणे सुरू आहे. खोदकाम व यामध्ये मुरलेले पावसाचे पाणी व बुजविण्यासाठी मातीचाच वापर त्यातून साइट शोल्डर भुसभुशीत झाली आहे. यामध्ये वाहन फसून मोठा अपघात होण्याची शक्‍यता आहे, तर दुसरीकडे झाडाच्या बुंध्यालगतच्या खोदकामामुळे रस्त्यालगतच्या झाडांची मुळे कमकुवत झाली आहेत. त्यातूनच झाडे कोसळण्याचा घटनांत वाढ झाली आहे.

संबंधित ठेकेदार यांना राज्यमार्गाच्या साइड शोल्डरचे कुठल्याही प्रकारचे नुकसान न करता रोडच्या मध्यभागापासून 12 मीटरच्या पुढे खोदकाम करावे. या खोदकामात मार्गाच्या साइड शोल्डरचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, अशी सूचना दिली आहे. मार्गाच्या साइड शोल्डरचे नुकसान झाल्याचे लक्षात आल्यास त्याची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
- व्ही. ए. शिरभाते, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, दारव्हा.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com