मुलीची ममता : आईचा मृतदेह बघताच मुलीनेही घेतला जगाचा निरोप

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 November 2019

ज्या आईने आपल्याला जन्म दिला, वाढवले, जिच्या अंगाखांद्यावर खेळून आपण मोठे झालो, जिने आपल्याला जगायला शिकवले ती आपली माय कायमची सोडून गेल्याने शालिनी यांना जबर धक्का बसला.

सेलू (वर्धा) : आपली जवळची व्यक्ती अचानक गेल्याने सर्वांनाचा दु:ख होतो, अनेकदा हा धक्का असह्य ठरतो. असाच धक्का एका मुलीला तिची आई जाण्याचा बसला. हा धक्का मात्र त्या मुलीला सहन होऊ शकला नाही आणि तिनेही आईपाठोपाठ जगाचा निरोप घेतला. सर्वांना हळहळ वाटेल अशी ही घटना सूेल येथे घडली. 

मनोरमा कुशाबराव कांबळे (वय 75) प्रभाग क्र. 15 सेलू यांचे गुरुवारी (ता. 28) काल अचानक निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी सर्व नातेवाईकांना देण्यात आली होती. शुक्रवारी (ता. 29) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यासाठी सर्वच नातेवाईक पोहोचले होते. मनोरमा कांबळे यांची मुलगी शालिनी अरविंद साळवे (वय 50) या देखील नागपूर येथून आईच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचल्या. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. 

शालिनी यांनी फोडला टाहो 
ज्या आईने आपल्याला जन्म दिला, वाढवले, जिच्या अंगाखांद्यावर खेळून आपण मोठे झालो, जिने आपल्याला जगायला शिकवले ती आपली माय कायमची सोडून गेल्याने शालिनी यांना जबर धक्का बसला. आईचे पार्थिव शरीर पाहून शालिनी यांनी अक्षरश: टाहो फोडला. आईच्या मृतदेहाजवळ जाताच त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला आणि तेथेच त्यांचाही मृत्यू झाला. 

नातेवाईक हळहळले 
अचानक ही घटना घडल्याने नातेवाईकांना देखील काही कळेनासे झाले. त्यांनी धावपळ करून मुलीचा मृतदेह नागपूर येथे पाठविला मात्र तोवर उशीर झाला होता. 
आई मनोरमा यांच्यावर सेलू येथे तर मुलगी शानिनी यांच्यावर नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कांबळे कुटुंबीयांवर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: daughter passes away while mother funeral

Tags
टॉपिकस
Topic Tags: