esakal | विषारी पाण्याने तलावातील मासोळ्यांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

विषारी पाण्याने तलावातील मासोळ्यांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : धान पिकावर केलेल्या फवारणीचे पाणी तलावात गेल्याने लाखो रुपये किमतीच्या मासोळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील नान्होरी येथे घडली.
नान्होरी येथे 2 हेक्‍टर 28 आर जागेवर तलाव आहे. पंचगंगा मत्स्यपालन सहकारी संस्थेने या तलावात रोहू, कतला, मिरगल, दाळक, शिपनस इत्यादी जातींच्या माशांची 60 हजार रुपयांची बिजाई सोडली आहे. माशा आता मोठ्या झाल्या आहेत. मात्र, तलावाच्या बाजुबाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी धानपिकावर फवारणी केली. त्यानंतर सलग दोन-तीन दिवस झालेल्या पावसाने बांद्यातील फवारणी केलेले पाणी तलावात गेले. विषारी पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाला. त्यामुळे सोसायटीचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे.

loading image
go to top