मृत्यूच सत्र सुरूच! दोन अपघातांत एक ठार; 17 जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

अमरावती : रेवसा व जनुना फाट्यावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत 1 ठार, तर 17 जण जखमी झाले. रेवसा फाट्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, तर जनुना फाट्यावर मजुरांची वाहतूक करणारी पिकअप व्हॅन उलटून अपघात घडला.

अमरावती : रेवसा व जनुना फाट्यावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत 1 ठार, तर 17 जण जखमी झाले. रेवसा फाट्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, तर जनुना फाट्यावर मजुरांची वाहतूक करणारी पिकअप व्हॅन उलटून अपघात घडला.
सोमवारी (ता. 30) सकाळी साडेनऊ ते दुपारी दीडच्या सुमारास हे अपघात झाले. वलगाव ठाण्याच्या हद्दीत रेवसा फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात प्रवीण श्रीकृष्ण गोंडके (वय 35 रा. अंजनवती) हे ठार झाले आहेत. प्रवीण त्यांची पत्नी संवाती प्रवीण गोंडके (वय 30), मुलगा प्रेम प्रवीण गोंडके (वय 6 रा. अंजनवती) हे तिघे अमरावतीहून रेवसाकडे येत असताना, विरुद्ध दिशेने येणाऱ्या योगेश विश्‍वास वानखडे (वय 25 रा. रेवसा) याच्या दुचाकीची त्यांना धडक बसली. अपघातात गोंडके दाम्पत्यासह त्यांचा लहान मुलगा प्रेम, असे तिघे जखमी झाले. तीनही जखमींना उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान प्रवीण गोंडके यांचा मृत्यू झाला. दुपारी एकच्या सुमारास रेवसा फाट्यावर ही घटना घडली.
वाशीम जिल्ह्यातील कामरगाव येथील 24 मजूर एमएच 01 एलए 3796 क्रमांकाच्या पिकअप व्हॅनमध्ये बसून नजीकच्या शिरसोली गावात जात होते. जुनुना फाट्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून पिकअप व्हॅन उलटली. त्यात किरोजाबाई गायकवाड, रंजना किशोर शेजव, धनराज पुजाजी किर्दक, उषा धनराज किर्दक, सरस्वता भगवान सहारे, व सविता राजेंद्र किर्दक हे सहा जण गंभीर जखमी झाले. त्या व्यतिरिक्त शालिकराव खंडारे, अशोक गजभिये, सुधीर शेजव, मनोहर वानखडे, कमला खंडारे, छाया वानखडे, मधुकर खंडारे, सरस्वती सहारे हे मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना अपघातानंतर उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death Season Begins! One killed in two accidents; 17 injured