गणपती विसर्जनला गेलेल्या युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

कारंजा (घा) ः तालुक्‍यातील जुनापाणी येथे गुरूवारी दुपारी गणपती विसर्जनाला गेलेल्या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी उजेडात आली. गुणवंत यादव गाखरे (वय 24 रा. जुनापाणी) हे मृताचे नाव आहे. गुरुवारी दुपारी चिरकुट धंडाळे यांच्या शेतातील विहिरीत चार ते पाच गणपती विसर्जनाला नेण्यात आले. त्यावेळी लोकांची गर्दी होती. काही वेळाने काही युवक विहिरीत गणपती विसर्जन केल्यानंतर पोहायला लागले. दरम्यान गुणवंत हा विहिरीत कसा बुडाला; याची कोणालाही माहिती नाही. मृताचे कपडे व मोबाईल गावातील युवकांनी घरी आणून दिले. त्यानंतर सायंकाळी पाचपर्यंत मुलगा घरी न आल्याने शंका आली.

कारंजा (घा) ः तालुक्‍यातील जुनापाणी येथे गुरूवारी दुपारी गणपती विसर्जनाला गेलेल्या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी उजेडात आली. गुणवंत यादव गाखरे (वय 24 रा. जुनापाणी) हे मृताचे नाव आहे. गुरुवारी दुपारी चिरकुट धंडाळे यांच्या शेतातील विहिरीत चार ते पाच गणपती विसर्जनाला नेण्यात आले. त्यावेळी लोकांची गर्दी होती. काही वेळाने काही युवक विहिरीत गणपती विसर्जन केल्यानंतर पोहायला लागले. दरम्यान गुणवंत हा विहिरीत कसा बुडाला; याची कोणालाही माहिती नाही. मृताचे कपडे व मोबाईल गावातील युवकांनी घरी आणून दिले. त्यानंतर सायंकाळी पाचपर्यंत मुलगा घरी न आल्याने शंका आली. लोकांनी गुणवंतला विहिरीवर असेल म्हणून पहायला गेले. तसेच त्यानंतर विहिरीत लोखंडी गळ टाकला. गळाला त्याचा मृतदेहच लागला. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a youth who went to Ganpati immersion