ganpat telmasare
sakal
पवनी - तालुक्यातील कोदुर्ली येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि विवंचनेतून विष घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणपत राजाराम तेलमासरे (वय ४७) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, मंगळवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.