पऱ्हाटी गेली पाण्यात, कापूस होणार नाममात्र

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

पारशिवनी (जि.नागपूर) :कोरड्या दुष्काळातून शेतकऱ्याची सुटका होत नाही; तोच मागील अनेक दिवसांपासून वरुणराजाने कहर सुरू केला आहे. पावसाचे थैमान सतत सुरू असल्याने पारशिवनी व इतर भागातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांवर पावसाने संक्रांत आणली आहे. शेतातील पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अनेक पिके अतिपावसाच्या तावडीत सापडल्याने सध्या नष्ट होत आहेत. पिकांची वाढ खुंटली असून पिके शेवटच्या आचका देत आहेत. 

कापसाच्या झाडाची वाढ पूर्णतः खुंटली असून अति पावसामुळे पाने लाल पडत आहेत. अनेक शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला असल्याने शेतपिके होणार का, याचीच शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. शेतकरी आता चिंतातुर झाला असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झाले आहे. संततधार पावसामुळे शेतात पिकाचे संगोपन करणे कठीण झाले आहे. पऱ्हाटी, सोयाबीन ही हाती आलेली पिके वाया जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सतत पाऊस पडत असल्याने पिके नष्ट होण्याची भीती व्यक्‍त केली जात असल्याने शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून संकटकाळी शेतकऱ्यांना उभे करणे गरजेचे आहे. शेतकरी मदतीची याचना करीत असून तत्काळ शासनाने मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी संजय व्यास, सचिन रुधे, जीवन कभे, इंद्रपाल गोरले, भारत देशमुख व इतर शेतकऱ्यांनी केली आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the deep water, cotton will be nominal