esakal | "माझं बाळ मला परत द्या हो"; दीपाली चव्हाणच्या आईचा टाहो; उपस्थितांच्याही डोळ्यांत पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

deepali chavan and mother

शकुंतला जनार्दन चव्हाण या दीपालीच्या आई. मुलीच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडेपर्यंत पाच ते सहा तास त्या शवागारातच बाकावर बसून होत्या. त्यांचे सांत्वन करण्यासाठी महिला वनअधिकारी आल्या.

"माझं बाळ मला परत द्या हो"; दीपाली चव्हाणच्या आईचा टाहो; उपस्थितांच्याही डोळ्यांत पाणी

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती ः पतीचे निधन झाले, मुलगाही सोडून गेला, एकमेव आशा दीपाली हिच्यावर होती, नोकरीच्या काळात तिच्यासोबत पाच वर्षे राहिले. अधिकाऱ्यांच्या जाचामुळेच तिने स्वत:ला संपविले. ती कर्तव्यदक्ष अधिकारी होती. माझ्यापासून हिरावलेलं माझं बाळ मला परत द्या, अशी आर्त हाक देत मृत आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या मातोश्रींनी हंबरडा फोडला. हे दृष्य प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडविणारे होते.

हेही वाचा - ...अन् नववधू पतीचा मृतदेह घेऊनच पोहोचली सासरी, हिरव्या मंडपातूनच निघाली अंत्ययात्रा

शकुंतला जनार्दन चव्हाण या दीपालीच्या आई. मुलीच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडेपर्यंत पाच ते सहा तास त्या शवागारातच बाकावर बसून होत्या. त्यांचे सांत्वन करण्यासाठी महिला वनअधिकारी आल्या. त्यांनी प्रशासनाची बाजू पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलगी दीपाली हिचा स्वभाव, काम करण्याची पद्धत आई शकुंतला यांना ठाऊक होती. त्यामुळे मुलीच्या आत्महत्येस दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी. त्यासाठी आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला तरी चालेल. या शब्दात आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

त्यावेळी अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिला अधिकाऱ्यांसोबत कसे वागावे हे त्यांना कळत नाही काय? असा प्रश्‍नही शकुंतला चव्हाण यांनी एका महिला अधिकाऱ्यांसोबत बोलताना उपस्थित केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना दीपाली भेटायला गेली होती. परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही. आपण जास्त शिक्षित नाही. पण अधिकारी तर सुज्ञ असतात ना? त्यांनी कुणाचा विचार करायला नको काय? असा प्रश्‍न उपस्थित करून त्यांनी पुन्हा आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

हेही वाचा - दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; उपवनसंरक्षक शिवकुमार नागपुरातून अटकेत; आत्महत्येस प्रवृत्त...

इतरांसोबत असे घडू नये

माझ्या आईला सुखरूप गावी पोचण्यासाठी मदत करा. शिवकुमार यांच्यावर कारवाई करा. माझ्यासोबत जे घडलं ते इतर कुणासोबतही होऊ नये. असे दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्व लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमुद केले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top