महिलांच्या प्रसुतीलाही ग्रहणबाधा!

शुभम बायस्कार
Saturday, 28 December 2019

राज्यभरातून येथील जिल्हा स्री रूग्णालयात महिला प्रसुतीसाठी येतात. दररोज 20 ते 25 प्रसुती येथे होत असल्याने डॉक्टरांना उसंत मिळत नाही. मात्र ग्रहणाच्या किरणांचा प्रसुतीवर परिणाम जाणवतो, ही अंधश्रद्धा समाजात अजूनही कायम असल्याने गुरुवारी (ता.26) सकाळी 8 ते 11 या ग्रहणकालावधीत जिल्हा स्री रूग्णालयात एकही प्रसुती झाली नसल्याचे दिसून आले आहे. तेव्हा महिलांच्या प्रसुतीलाही ग्रहणबाधा जाणवली.

अकोला : राज्यभरातून येथील जिल्हा स्री रूग्णालयात महिला प्रसुतीसाठी येतात. दररोज 20 ते 25 प्रसुती येथे होत असल्याने डॉक्टरांना उसंत मिळत नाही. मात्र ग्रहणाच्या किरणांचा प्रसुतीवर परिणाम जाणवतो, ही अंधश्रद्धा समाजात अजूनही कायम असल्याने गुरुवारी (ता.26) सकाळी 8 ते 11 या ग्रहणकालावधीत जिल्हा स्री रूग्णालयात एकही प्रसुती झाली नसल्याचे दिसून आले आहे. तेव्हा महिलांच्या प्रसुतीलाही ग्रहणबाधा जाणवली.

वर्षांच्या अखेरीस आलेल्या कंकणाकृती (खंडग्रास) सुर्यग्रहणाला भौगोलिक सोबतच विशिष्ट प्रकारचे खगोलीय महत्व आहे. अनेक ठिकाणी खगोलप्रेमिंकडून त्याचा आनंद घेण्यात आला. असे असले तरी मात्र याच ग्रहणाला अंधश्रद्धेचेही ग्रहण चिकटलेले असल्याचे दिसून आले आहे. या काळात अंधश्रद्धाळूंनी अनेक महत्वाच्या कामांना तिलांजली दिली. येथील जिल्हा स्री रूग्णालयात प्रसुतीच्या वार्डात दररोज प्रसुतीची मोठी धूम दिसून येते असते. परिणामी डॉक्टरांना उसंत मिळत नाही. मात्र गुरुवारी आलेल्या कंकणाकृती ग्रहणकाळात काही किरणं वर्ज मानलेली जात असल्याने जीव धोक्यात येऊ नये म्हणून काहींनी त्याला विलंब लावला. त्यामुळे दररोज सुमारे 20 ते 25 प्रसुती होणाऱ्या जिल्हा स्री रूग्णालयात ग्रहणकाळात मात्र एकही प्रसुती झाली नसल्याचे पूढे आले.

महत्त्वाची बातमी -  सात्विक क्लिनीकमध्ये असात्विक काम

ग्रहणाच्या दिवसातील प्रसुतीची स्थिती
वेळ                          झालेल्या प्रसुतींची संख्या
सकाळी 8 ते 11.00                           00
सकाळी 11 ते रात्री 8                         14
रात्री 8 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8-     03

ग्रहणकाळात एकही प्रसुती झाली नाही. किरणांचा परिणाम होतो, असा समज अजूनही आहे. त्यामुळे महिला बाहेर पडत नाहीत. पणं महिला आमच्याकडे आल्यास आम्ही मात्र प्रसुतीला प्राध्यान्य देतो.
-डॉ.महेंद्र मोहिते, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा स्री रूग्णालय, अकोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delivery to the eclipse