विवाहितेला हुंड्याची मागणी, पाच जणांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नागपूर : आई-वडिलांकडून हुंडा म्हणून तीन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा पतीसह सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी कळमना पोलिसांनी गुप्ता कुटुंबातील दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला.

नागपूर : आई-वडिलांकडून हुंडा म्हणून तीन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा पतीसह सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी कळमना पोलिसांनी गुप्ता कुटुंबातील दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता चंदन गुप्ता (35, रा. शिक्षक कॉलनी, कळमना) हिचे 24 एप्रिल 2017 रोजी समीर गुप्तासोबत लग्न झाले. तेव्हापासूनच सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू होता. समीर चंदनला शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा. समीरची चुलत बहीण साधना गुप्ता हिच्या सांगण्यावरून समीर पत्नी चंदनला क्रूर वागणूक द्यायचा. आरोपी रामदास शाहू गुप्ता, बुधराणी शाहू गुप्ता, रवी रामदास शाहू गुप्ता, करण ऊर्फ पिंटू शाहू गुप्ता हुंड्यासाठी चंदनचा छळ करायचे. 15 मे 2017 रोजी आरोपींनी तिला तिच्या वडिलांकडून तीन लाख रुपये आणण्यास सांगितले. चंदनचे वडील तिच्या सासरी आले असता सासरच्या लोकांनी तिला तिच्या वडिलांसोबत माहेरी पाठवून दिले. चंदनने समीरला फोन केला असता तीन लाख रुपये आणत असशील तरच मी तुला घरात घेणार असल्याचे दटावले. त्यामुळे चंदनच्या वडिलांनी मुलीच्या हाती तीन लाख रुपये देऊन तिला सासरी पाठविले. तरीही सासरच्या लोकांचा छळ सुरूच होता. एवढेच नव्हे तर तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी चंदनच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी सासरच्या लोकांविरुद्ध 498(अ), 406, 34 अन्वये गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for a bride to marry, crime against five