Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी
Flood Damage: सिंदखेडराजा मतदारसंघातील काही भागात २५-२६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला. आमदार मनोज कायंदे यांनी शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
देऊळगाव राजा : सिंदखेडराजा मतदारसंघातील काही मंडळामध्ये गत २५,२६ जून रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याची मागणी २ जुलै रोजी आमदार मनोज कायंदे यांनी अधिवेशनात केली.