कोरची ग्रामीण रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरु करण्याची मागणी

नंदकिशोर वैरागडे 
रविवार, 5 ऑगस्ट 2018

कोरची तालुक्यातील दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अहवालानुसार बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रातील अति तीव्र कुपोषित बालकांची संख्या 32 असून मध्यम कुपोषित बालकांची संख्या 199 आहे. तर कोडगुल प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीव्र कुपोषित बालकांची संख्या 7 असून मध्यम कुपोषित बालकांची संख्या 62 आहे.

कोरची - गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 115 किमी अंतरावर असलेल्या कोरची तालुक्यात 45 हजार लोकसंख्या असलेल्या तालुक्यात एक ग्रामीण रुग्णालय, दोन प्राथमिक आरोग्य केंद्र अशी आरोग्य व्यवस्था असताना या परिसरात आदिवासी जमाती व अशिक्षित अशिक्षित लोकांचा प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या तालुक्यात गरोदर माता मृत्यू बालमृत्यू कुपोषित बालकांचा मृत्यू प्रमाण खूप अधिक आहे. या तालुक्यात कोरची मुख्यालय असलेल्या ग्रामीण रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी तालुक्यातील माता-भगिनींनी केलेली आहे.

कोरची तालुक्यातील दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अहवालानुसार बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रातील अति तीव्र कुपोषित बालकांची संख्या 32 असून मध्यम कुपोषित बालकांची संख्या 199 आहे. तर कोडगुल प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीव्र कुपोषित बालकांची संख्या 7 असून मध्यम कुपोषित बालकांची संख्या 62 आहे. खुर्ची तालुक्यात आम्ही आमच्या आरोग्यासाठी या स्वयंसेवी संस्थेने स्वयंसेवी संस्थेने केलेल्या चाळीसगावातील कुपोषित बालकांची संख्या व महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने केलेली अहवाल या दोन दोन्हीमध्ये खूप मोठा तफावत आहे.

संस्था आम्ही आमच्या आरोग्य संस्थेने सर्वेक्षण केलेल्या अहवालात 4 प्रकारच्या अहवाल सादर केला असून वजन न वाढणारे 49 मध्यम 80 तीव्र कुपोषित 29 सामान्य कुपोषित 31 अशी कुपोषण बालकांचे स्थिती आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती मिळू शकली नाही. नेहमी आरोग्य विभाग व बाल विकास प्रकल्प यांच्या अहवालात नेहमी तफावत आढळते. शासनाच्या दोन्ही एजन्सी काम करीत असताना सत्य परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून दिली जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागात कुपोषित बालकांच्या मृत्यूचा दर वाढत जातो. एप्रिल ते जुलै पर्यंत बालमृत्यूंची संख्या 6 असून गरोदर मातेची मृत्यूची संख्या दोन आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवा किती चांगली आहे, हे निदर्शनास येते. त्यामुळे कोरची ग्रामीण रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी तालुक्यातील केली जात आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या कोरची हे तालुक्याचे ठिकाण आहे या परिसरात मातामृत्यू बालमृत्यू कुपोषणाचे उच्चाटन करण्यासाठी चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करून कोरची ग्रामीण रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू व वाटल्यास निधीची तरतूद करू. - आमदार कृष्णा गजबे आरमोरी निर्वाचन क्षेत्र

कोरची हे अतिदुर्गम भाग असून या परिसरातील आदिवासी जनता अशिक्षित असल्याने गरोदर मातेचे संगोपन बाळाचे संगोपन करण्यासाठी बालमृत्यू मातामृत्यू कुपोषण मुक्त मलेरियाने होणारे  लहान बालकास मृत्युदर कमी करण्यासाठी खुर्ची ग्रामीण रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरु करणे गरजेचे आहे. - डॉक्टर बागराज धूर्वे, रीजनल मेडिकल ऑफिसर जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली

कोरची तालुक्यात श्री स्त्री तज्ञ बाल रोग तज्ञ नियुक्ती करून कोरची तालुक्यातील मातामृत्यू बालमृत्यू कुपोषणा  वरती मात करण्यासाठी शासनाने खुर्ची ग्रामीण रुग्णालयात बाल उपचार केंद्र तात्काळ सुरू करावे. - कुमारीबाई जमकातंन, सामाजिक कार्यकर्त्या कोरची

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for setting up a child treatment center in Korchi rural hospital