
‘संजय राठोड तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणा त्यांच्यासमर्थकांकडून देण्यात येत होते. आज त्यांनी एकप्रकारे शक्ती प्रदर्शन केल्याचे बोलले जात आहे.
पोहोरागड (जि. वाशीम) : राज्याचे वनमंत्री संजय राठोड १५ दिवस भूमिगत राहिल्यानंतर मंगळवारी प्रथमच लोकांसमोर आले. पोहोरादेवी गडावर पोहोचल्यानंतर त्यांनी जगदंबा देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी सेवालाल महाराजांच्या समाधीचे घेतले दर्शन घेतले. प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ते काहीही बोलले नाही.
यावेळी संजय राठोड यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती. राठोड यांच्यासोबत सोल्फी काढण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मात्र, हे सर्व करीत असताना कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले. ‘संजय राठोड तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणा त्यांच्यासमर्थकांकडून देण्यात येत होते. आज त्यांनी एकप्रकारे शक्ती प्रदर्शन केल्याचे बोलले जात आहे.
परळी (वैजनाथ) येथील टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या प्रकरणात वनमंत्री राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. तेव्हापासून ते भूमिगत होते. आज प्रथमच ते जनतेसमोर आले. या ठिकाणी समर्थक मोठ्या संख्येत जमले आहेत. पोलिस बंदोबस्तही लावल्यात आलेला आहे.