कामठीत डेंगीचा प्रसार, एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

कामठी  (जि.नागपूर): तालुक्‍यातील येरखेडा ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या यशोधरा नगरात राहत असलेले डाक विभागात कार्यरत एका व्यक्तीचा डेंगीची लागण झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. दिनेश गुलाबराव खोब्रागडे (वय 57, रा. यशोधरा नगर, कामठी) असे मृताचे नाव आहे. 

मागील ऑगस्ट महिन्यात यादवनगर येथील मानसिंग यादव नामक व्यक्तीचा डेंगीने मृत्यू झाल्याच्या घटनेला विराम मिळत नाही तोच पुन्हा डेंगीने एकाचा मृत्यू झाल्याने कामठी परिसरात डेंगीच्या नियंत्रणाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, दिनेश खोब्रागडे हे दोन दिवसांपूर्वी कामावरून सायंकाळी घरी परतले. त्यानंतर त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने कामठी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, परिस्थिती नाजूक झाल्याने उपचारार्थ त्वरित नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर येथील राणी तलाव मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत पोस्ट ऑफिस जरीपटका येथे पोस्टमास्तर पदावर कार्यरत होते. त्यांच्यामागे पत्नी व मुलगा असा आप्तपरिवार आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue prevalence in work, death of one