शेगाव : श्रींच्या पालखीचे 8 जूनला प्रस्थान

The departure of Gajanan Maharaj Palkhi on June 8 at Shegaon
The departure of Gajanan Maharaj Palkhi on June 8 at Shegaon

शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थानची 'श्री'ची पालखी पंढरपूर वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह 8 जूनला सकाळी 7 वाजता निघणार आहे. 

श्री क्षेत्र पंढरपूरला संतांच्या पालख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून जातात. 1968 पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारीची परंपरा सुरु आहे. यावर्षी पालखीचे हे 52 वे वर्ष आहे. श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत 725 कि. मी. आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा 550 किलोमीटर आहे. असा एकुण प्रवास 1275 किलोमीटरचा आहे. श्रींच्या पालखीला शहरातील श्रींचे प्रगटस्थळ, देशमुख यांच्या मळ्यात वारकऱ्यांना फराळ, चहा देण्यात येतो.

तद्नंतर श्रींची पालखी बुधवार, 8 जून ला श्री क्षेत्र नागझरीकडे प्रस्थान करणार आहे. संतनगरीतील हजारो भक्तगण आपल्या लाडक्या राजाला प्रेमाने निरोप देतात. श्रींचे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना ठिकठिकाणी चहापानी व अल्पोपहाराची व्यवस्था केलेली राहते. तसेच श्रींच्या पालखीचे गावातील नागरीकांकडून मनोभावे श्री महाराजांना शाल, श्रीफळ वाहून स्वागत केल्या जाते. श्रींचे पालखी सोबत प्रवास करताना वारकऱ्यांची दुपारी व रात्री भोजन प्रसादाची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे वाटेने चहापाणी व फराळाची व्यवस्था सुध्दा श्रींच्या भक्तांकडून केल्या जाते. रात्रीचे मुक्कामी निवासाची व्यवस्था धर्मशाळा, मंगल कार्यालय व शाळा यामध्ये केलेली असते. दिंडीतील वारकरी मंडळींना आवश्यकतेनुसार औषध, इंजेक्शन, सलाईन देवून सेवार्थ औषधोपचार करण्यात येतो. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याकरीता टँकरची व्यवस्था करण्यात येते. 

विशेष कारागिरांनी तयार केली पालखी -
शेगाव संस्थानने श्री महाराजांची चांदीची नवीन पालखी बनारस येथील कारागिरांनी तयार केली असून त्यावरील नक्षीकाम कलाकुसरीने पूर्ण आहे. 

पालखीचा मार्ग -
8 जूनला श्री क्षेत्र नागझरी, गायगाव, भौरद, अकोला, भरतपूर, वाडेगाव, देऊळगाव, पातुर, मेडशी, श्री क्षेत्र डव्हा, मालेगाव, शिरपूर जैन, चिंचाबा पेन, म्हसला पेन, किनखेडा, रिसोड, पान कन्हेरगाव, सेनगाव, परभणी, गंगाखेड, परळी, अंबाजोगाई, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर, मंगळवेढा मार्गे 10 जुलै ला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचेल.

परतीचा प्रवास -
श्री क्षेत्र पंढरपूर येथे 10 ते 15 जुलैपर्यंत मुक्काम राहून करकंब, कुर्डूवाडी, भगवान बार्शी, पाली, बिड, गेवराई, शहापूर, लालवाडी, जालना, सिंदखेडराजा, जालना, लोणार, मेहकर, जानेफळ, शिर्ला नेमाने, आवार व खामगाव येथे 16 ऑगस्टला मुक्काम व 6 ऑगस्टला श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगावात परत येइल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com