प्रभारी उपसंचालक म्हणतात, शिक्षकांचे आंदोलन म्हणजे नौटंकी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर  : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटना सातत्याने आंदोलन करीत आहे. मात्र, त्यांचे आंदोलन म्हणजे "नौटंकी' असल्याची मुक्ताफळे नागपूर विभागीय शिक्षण कार्यालयाचे प्रभारी उपसंचालक सतीश मेंढे यांनी उधळली आहेत. या प्रकाराने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेकडून विभागात पूर्णकालीन उपसंचालकांची नियुक्‍ती करण्याची मागणी आयुक्‍तांकडे केली आहे.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेकडून आनंद कारेमोरे यांच्या नेतृत्वात शनिवारी सायंकाळी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी उपसंचालकांनी संघटनेला एक तारखेला 70 टक्के शाळांचे पगार होणार असल्याचे पत्र दिले. प्रत्यक्षात काहीच शाळांचे वेतन एका तारखेला झाले. बहुतांश शाळांचे वेतन अद्याप झालेले नाहीत. शिवाय सातव्या वेतन आयोगाच्या दोन महिन्यांच्या वेतन फरकाची रक्कमही सप्टेंबर महिन्यात जमा करण्याचे आश्‍वासन फोल ठरले. उपसंचालकांनी वेतन पथकाचे लिपिक प्रशांत राऊत यांना आदेश दिल्यानंतरही कार्यवाही न झाल्याने त्याविरोधात आंदोलन करून निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ उपसंचालक सतीश मेंढे यांच्याकडे गेले. त्यावेळी त्यांनी तुमचे आंदोलन म्हणजे "नौटंकी' असल्याची मुक्ताफळे उधळली. यावरून संघटनांनी आक्रमक होत प्रभारी उपसंचालकांचा निषेध केला. तसेच लिपिकापासून अधिकाऱ्यांपर्यंत कुणीही ऐकत नसल्याने या ठिकाणी पूर्णवेळ उपसंचालक नेमण्यात यावा, अशी मागणी केली. आंदोलनात प्रमोद रेवतकर, संदीप सोनकुसरे, विठ्ठल जुनघरे, तेजराज राजुरकर, अविनाश बडे, रमेश काकडे, अनिल गोतमारे, विजय नंदनवार, रहमत्तुलाह खान, जयंत बुधे, वामन सोमकुंवर, प्रभाकर पांडे, प्रमोद अंधारे आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The deputy director in charge says the teachers' movement is a gimmick