esakal | उपअभियंता व शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

उपअभियंता व शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : जिल्हा परिषदेचा उपअभियंता व पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याला बुधवारी (ता. 4) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सार्वजनिक शौचालय बांधकामाच्या एमबी बुकवर स्वाक्षरी करण्यासाठी संगनमताने लाच मागितल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. पंधरा दिवसातील उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्यांवर झालेली ही दुसरी कारवाई आहे.
शाखा अभियंता गजेंद्र परमाल व उपअभियंता किशोर साकोरे असे आरोपींचे नाव आहे. धामणगाव तालुक्‍यातील वाठोडा (बु.) येथील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. सदरचे शासकीय काम हे दोन्ही अधिकाऱ्यांच्या देखरेखीत पूर्ण झाले. प्रशासकीय मंजुरीनंतर तांत्रिक मंजुरी व त्यानंतर पंचायत समितीच्या शाखा अभियंता गजेंद्र परमाल यांची व त्यानंतर जिल्हा परिषदेच्या चांदूर रेल्वे येथील उपअभियंता किशोर साकोरे यांच्या स्वाक्षऱ्या होतात. तेव्हापासून तक्रारदाराला वरील अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केली. बांधकाम पूर्ण केल्यावर 7 ऑगस्ट रोजी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी मोजमाप पुस्तिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी 2 टक्के प्रमाणे चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच यापूर्वीच्या कामाचे पाच हजार रुपये असे एकूण नऊ हजारांची मागणी केली. दरम्यान, एसीबीच्या पथकाने किशोर साकुरे यांनी स्वतःच्या घरी 9 हजार रुपायांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले.

loading image
go to top