

Vidarbha News
esakal
देऊळगाव राजा: शहरातील मुख्य मार्ग असलेल्या व्यापारी संकुलाला लागलेल्या भीषण आगीत दोन किराणा दुकानांसह सात दुकानें भस्मसात झाली. सदर घटना (ता. ८) सकाळी नऊच्या सुमारास घडली असून नगरपालिकेच्या दोन्ही अग्निशमन वाहनांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचा अंदाज व्यक्त होत असून ह्या भीषण आगीत सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.