esakal | विदर्भाचा विकास कारायचं? स्टार्टअप सुरू करा
sakal

बोलून बातमी शोधा

नितीन गडकरी

विदर्भाचा विकास कारायचं? स्टार्टअप सुरू करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राजकारणात असताना केवळ शाळा, कॉलेज काढून विदर्भाचा विकास करता येणे शक्‍य नाही. "स्टार्टअप'तयार नोकऱ्या निर्माण करीत युवकांना काम दिल्यास विदर्भाचा विकास होईल असे सांगून शाळा, कॉलेज काढणाऱ्या कॉंग्रेसी नेत्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोला हाणला.
महापालिकेतर्फे आयोजित इनोव्हेशन पर्वात "स्टार्टअप'कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी गडकरी म्हणाले, की विदर्भातील बहुतांश कॉंग्रेसी नेत्यांनी सत्ता असताना, त्याचा उपयोग केवळ स्वत:ची महाविद्यालये उभारण्यासाठी केला. त्यामुळे विदर्भ विकासापासून दुर लोटला. इनोव्हेशनमुळे आपली गरिबी दूर होऊ शकते. नवनवीन संकल्पनातून काम करायला नेहमीच आवडते. त्यामुळे वेगवेगळे प्रयोग करीत असतो. राजकारणी होण्यापेक्षा प्रयोगशिल व्यक्ती होणे कधीही आवडेल. विदर्भातील पन्नास हजार तरुणांच्या हाताला काम द्यायचे आहे. मी जे बोलतो ते करुन दाखवितो. येणाऱ्या काळात ते शक्‍य करणार आहे. यावेळी तरुणांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, गुणवत्ता आणि कर्तुत्वाने प्रामाणिक प्रयत्न करुन माणूस मोठा होतो. त्यासाठी कुणी काय म्हणेल याचा विचार करू नका. आपल्या प्रयत्नावर विश्‍वास ठेवा. स्कील आणि टॅलेन्टच्या माध्यमातून जगाला झुकविण्याची ताकद तरुणांमध्ये आहे. आऊट ऑफ बॉक्‍स विचार करा, तुमच्यामधील क्षमता वापरा. त्यातून देशाचा विकास होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात भारत गणेशपुरे व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

loading image
go to top