
आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी स्वाभिमान संघटनेमधून हकालपट्टी : राजू शेट्टी
मोर्शी : मोर्शी वरुड विधानसभेचे आमदार देवेंद्र भुयार यांचा आज पासून शेतकरी स्वाभिमान संघटनेशी काही संबंध राहिलेला नसून त्यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे अशी घोषणा संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी हिवरखेड येथे भरलेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात केली.मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे स्वाभिमान शेतकरी संघटनेने भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांनी मार्गदर्शन केले. जे शेतकऱ्यांवर अन्याय करतात त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत स्थान नाही, सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे शेतकऱ्यांच्या जमिनीवर बांधलेल्या धरणामध्ये तयार झालेली वीज ही शेतकऱ्यांच्या हक्काची आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.
शेतकऱ्यांना दिवसा विजेचा पुरवठा झालाच पाहिजे यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न चालू असून येत्या पंधरा दिवसात सरकारने यावर ठोस निर्णय न घेतल्यास मोठे जन आंदोलन उभारण्याची घोषणा त्यांनी केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकाऱ्यांनी विद्यमान आमदाराविरुद्ध प्रचंड नाराजी व्यक्त करून त्याची संघटनेतून हकालपट्टी करण्याची एकमुखाने मागणी करण्यात आली होती तसे फलक सुद्धा कार्यक्रमात झलकवण्यात आले.
Web Title: Devendra Bhuyar Expelled Shetkari Swabhiman Sanghatana Raju Shetty
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..