राज्यात आपलं सरकार आल्यापासून कसं मोकळं मोकळं वाटतंय; देवेंद्र फडणवीस

फडणवीस : युवा स्वाभिमानच्या दहीहंडीत राजकीय फटकेबाजी
Devendra Fadnavis bjp government navneet rana ravi rana amravati
Devendra Fadnavis bjp government navneet rana ravi rana amravatisakal

अमरावती : आपले सरकार राज्यात आल्यापासून कसे सर्व मोकळे वाटत आहे. पूर्वी सारेकाही बंदिस्त असल्यासारखे वाटत होते. आता यापुढील सर्व सण, उत्सव अशाच धडाकेबाज पद्धतीने साजरे करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवा स्वाभिमानच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात केले. विशेष म्हणजे, या दहीहंडीच्या वेळी फडणवीस यांनी राणा दाम्पत्याचे कौतुक करीत संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.

युवा स्वाभिमानच्या वतीने आयोजित दहीहंडीकरिता सिनेस्टार गोविंदा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना हनुमान चालिसा पठण केल्याबद्दल १४ दिवसांचा तुरुंगवास सहन करावा लागला. तत्कालीन सरकारकडून त्यांच्यावर विविध मार्गांनी दबाव आणला गेला. मात्र, दबावाला बळी न पडता राणा दाम्पत्याने आपला लढा सुरू ठेवला. भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीमागे उभे असल्याची ग्वाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दहीहंडीची मटकी फोडल्यानंतर त्यामधील मलाई सर्वांना वाटली जाते. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी स्वतः राज्यात विकासाची हंडी फोडत असून त्यामधून निघणारी विकासाची मलाई सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविल्याशिवाय राहणार नाही, असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘ईडी’ चांगले काम करीत आहे

भ्रष्टाचार करणाऱ्यांना जेलची हवा खावीच लागणार आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने ईडी चांगले काम करीत आहे. भ्रष्टाचार कराल तर जेलमध्ये जावेच लागणार, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. सत्तेमधून बाहेर गेल्यानंतर अनेक नेत्यांना आता मेळघाटची आठवण झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला. तुम्ही सत्तेत असताना मेळघाटसाठी काय केले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com