

Dhamangaon Farmer Case
esakal
धामणगाव रेल्वे: मातीत घाम गाळूनही पदरी येणारी नापिकी आणि डोक्यावरून उतरता न येणारे कर्जाचे ओझे, अशा परिस्थितीशी झुंज देताना अखेर एका कष्टकरी शेतकरी बापाने जीवनाची लढाई संपवली. तालुक्यातील बोरगाव निस्ताने येथील ५२ वर्षीय शेतकरी संजय भोपतराव भलावी यांनी शनिवारी (ता.२२) दुपारी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.