Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग; ३०-४० घरे, पिके, कागदपत्रे व रोकड जळून खाक, लाखोंच्या नुकसानीने ग्रामस्थ उघड्यावर
Dhamangaon Village Devastated: Massive Fire Guts 30-40 Houses in Bhiwapur

Dhamangaon Village Devastated: Massive Fire Guts 30-40 Houses in Bhiwapur

Sakal

Updated on

भिवापूर: भिवापूर तालुक्यातील धामणगाव विद्यामंदिर येथे आज एका भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे. एका अज्ञात व्यक्तीने गावाशेजारील कुटाराला लावलेल्या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे गावातील ३० ते ४० घरे जळून खाक झाली आहेत. या आगीत शेतकऱ्यांचे कापूस पीक,सोयाबीन,हरभरा,गहू, बैलांचा चारा (कुटार आणि तनस), महत्त्वाची कागदपत्रे आणि रोकड जळून खाक झाल्याने ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com