ढाणकी : परिसरासह लगतच्या नदीकाठच्या गावांमध्ये सध्या हळद काढणीच्या कामाला वेग आला आहे. यावर्षी निसर्गाची अवकृपा आणि कंदकुजीच्या प्रादुर्भावामुळे हळदीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे..एकीकडे उत्पादन कमी आणि दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे भासणारा मजुरांचा तुटवडा, अशा दुहेरी संकटात येथील हळद उत्पादक शेतकरी सापडला आहे. ढाणकी, खरूस, टेंभुरधरा, गांजेगाव, बिटरगाव, सोईट, मेट, मन्याळी, सावळेश्वर यासह पैनगंगा नदी व ओढ्याकाठी असलेल्या शेतजमिनीत यावर्षी पाण्याचा निचरा योग्य रीतीने झाला नाही. .Sangli Farmer : अतिवृष्टी, करपा व मावा रोगाचा फटका; शिराळा तालुक्यात ऊस उत्पादनात ३० टक्के घट.परिणामी, हळद पिकाला ’सड’ आणि ’कंदकुज’चा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यामुळे दरवर्षीच्या तुलनेत हळदीचा उतारा कमालीचा घटला असल्याची ओरड शेतकरी करत आहेत. .मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच उष्णतेची तीव्र लाट सुरू झाली आहे. या प्रतिकूल हवामानात हळद काढणीसाठी मजूर मिळवणे कठीण झाले आहे..Yeola Water Crisis : येवल्याच्या पूर्व भागात 'धो-धो' पाऊस पडूनही कोरड दुष्काळ; कांदा वाचवण्यासाठी टँकरचा आधार!.मजुरांच्या कमतरतेमुळे काढणीची कामे रेंगाळली असून शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्नात झालेली घट आणि मजुरांच्या टंचाईमुळे ढाणकी परिसरातील शेतकरी सध्या चिंतेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.