

Vidarbha News
esakal
धारणी: धारणी प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील चित्री–लवादा वर्तुळात लागलेल्या भीषण आगीमुळे मोठ्या प्रमाणावर जंगल जळून खाक झाले आहे. या आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की, वन विभागाच्या अथक प्रयत्नांनंतरही तत्काळ नियंत्रण मिळवणे कठीण झाले. परिणामी, अनेक हेक्टर क्षेत्रातील घनदाट जंगल पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून पर्यावरणावर गंभीर परिणाम झाला आहे.