Drought Crisis: दुष्काळ पाहणी दौऱ्यात मांडली होती व्यथा;राजेंद्र सपाटे यांच्या आत्महत्येने भंडारा जिल्ह्यात हळहळ

Dhop Farmer Death, Rajendra Sapate, Bhandara Farmer Distress : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धोप येथे राजेंद्र सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
Farmer Rajendra Sapate from Dhop village in Bhandara district had shared his concerns during a drought inspection visit on October 3.

Farmer Rajendra Sapate from Dhop village in Bhandara district had shared his concerns during a drought inspection visit on October 3.

esakal

Updated on: 

​मोहाडी : निसर्गाची अवकृपा आणि शासनाच्या उदासीनतेमुळे त्रस्त असलेल्या एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. ८) सकाळी तालुक्यातील धोप येथे घडली. राजेंद्र सपाटे (वय ५०, रा. धोप) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. उल्लेखनीय म्हणजे, राजेंद्र सपाटे या शेतकऱ्याने शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यापुढे आपली व्यथा मांडली होती. त्यानंतरही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com