नवेगाव खैरीच्या दहा दरवाजातून विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

टेकाडी/ पारशिवनी (जि. नागपूर) : ऑगस्ट महिन्यात मृतसाठा शिल्लक असलेल्या तोतलाडोह धरणाच्या दोन्ही जलशयात 95 टक्‍क्‍यांच्यावर जलसाठा झाल्याने दोन्ही धरणातून नदीत विसर्ग सुरू आहे. आज शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पेंच प्रकल्पाच्या नवेगाव (कामठी) खैरी जलाशयाचे 16 पैकी 14 दरवाजे 1 फुटाने उघडण्यात आले. दुपारी दहा दरवाजातून विसर्ग नदीत सुरू होता.

बुधवारी तोतलाडोह धरणाचे सर्व 14 दरवाजे उघडण्यात आले होते. सध्या तोतलाडोहचे सहा दरवाजातून विसर्ग सुरू आहे. तोतलाडोहचे पाणी पेंच नवेगाव खैरी जलाशयात आल्याने हा प्रकल्पही पूर्णत: भरला आहे. पाण्याची पातळी वाढल्याने व तोतलाडोहचा सतत विसर्ग सुरू असल्याने शुक्रवारी सकाळी सुरुवातील सहा, नंतर आठ व त्यानंतर 14 दरवाजे खुले करण्यात आले होते. दुपारी तीन वाजता त्यातील चार दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले.नवेगाव धरणातून थेट नदीत विसर्ग होत असल्याने पारशिवनी तालुक्‍यातील पेंच व कामठी व मौदासह कुही तालुक्‍यातील कन्हान नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कुणीही नदीपात्रात जाऊ नये असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.10 ऑगस्टला पेंच प्रकल्पाच्या नवेगाव खैरी जलाशयात 25.22 टक्के तर तोतलाडोहमध्ये 0.58 टक्के जलसाठा होता. तर एका महिन्यानंतर 11 सप्टेंबर रोजी तोतलाडोहमध्ये 95 टक्के व नवेगावमध्ये 65 टक्के जलसाठा निर्माण झाला होता. सध्या पेंच जलाशयातील 10 दरवाजे 1 फुटापर्यंत उघडे असून त्यातून पाण्याचा विसर्ग धो-धो सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Digging through the ten gates of Navegaon Khair