

Six swords seized; 25-year-old man detained in Digras.
Sakal
दिग्रस : जिल्ह्यात अवैधरीत्या घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून, याच मोहिमेअंतर्गत यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने दिग्रस तालुक्यातील हरसूल येथे मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत एका तरुणाच्या घरातून तब्बल ६ धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.