Yavatmal News: मोबाईलनंतर आता एआयची झळ छायाचित्रणाचा व्यवसाय अडचणीत; ऑनलाइन संस्कृतीचा वाढता प्रभाव

Photography Crisis: दिग्रस तालुक्यातील फोटोग्राफी व्यवसाय आज तंत्रज्ञानाच्या दबावाखाली आहे. मोबाईल कॅमेरे, डिजिटल एडिटिंग, एआय इफेक्ट्स आणि ऑनलाईन शॉपिंगमुळे पारंपरिक फोटोग्राफर्सना मोठा फटका बसतोय.
Yavatmal News

Yavatmal News

sakal

Updated on

दिग्रस (जि. यवतमाळ) : लग्नसमारंभ असो की वाढदिवस, उद्‍घाटन सोहळा असो की धार्मिक-सामाजिक कार्यक्रम फोटोग्राफरची (छायाचित्रकार) उपस्थिती अनिवार्य मानली जात होती. कॅमेरा, लाईट, अल्बम आणि अहोरात्र मेहनतीच्या जोरावर अनेक कुटुंबांचे संसार या व्यवसायावर उभे होते. स्मृती जपण्याचे काम करणारा हा व्यवसाय कालौघात तंत्रज्ञानाच्या वादळात सापडताना दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com