esakal | वर्धेत गोळीबार! जखमीच्या घरासमोर रक्ताचा सडा; नागरिकांमध्ये चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

वर्धेत गोळीबार! जखमीच्या घरासमोर रक्ताचा सडा; नागरिकांमध्ये चर्चा

वर्धेत गोळीबार! जखमीच्या घरासमोर रक्ताचा सडा; नागरिकांमध्ये चर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा) : शहरातील संत चोकोबा येथे बुधवारी सकाळी अकरा वाजता युवकाला घरातून बाहेर बोलवत गोळीबार केल्याच्या चर्चेने दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आरोपीच्या मागावर निघाले. हिंगणघाट नजीकच्या जुनोना घाटावर जखमीसह आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मोहन प्रकाश भुसारी (२२, रा. चोखोबा वॉर्ड) असे जखमी युवकाचे नाव आहे. (Discussion-on-shooting-in-Sant-Chokhoba-ward-of-Wardha-district)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन प्रकाश भुसारी हा युवक आज सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घरी होता. दरम्यान, काही युवक त्याच्या घरासमोर आले. त्यांनी मोहनला आवाज देत घराबाहेर बोलावले. यानंतर गोळीबार केल्याची माहिती आहे. मोहन भुसारी याच्या घरासमोर रक्ताचा सडा पडला होता. तसेच आजुबाजूच्या नागरिकांना बंदुकीची गोळी चालल्याचा आवाज आला होता. गांजा पिने व चोऱ्या करणे अशा प्रवृतीचे आरोपी व जखमी असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: Woman Power : विदर्भात एका विभागीय आयुक्तासह पाच महिला जिल्हाधिकारी

मोहनला जखमी करून आरोपी जबरदस्ती दुचाकीवर बसवून घेऊन गेले. पोलिसांनी जखमी मोहन व आरोपींना हिंगणघाट नजीकच्या जुनोना घाटावरून ताब्यात घेतले. तसेच आरोपींना बापरलेली बंदूक जप्त केली. ही बंदूक नकली असून, बंदुकीच्या खालच्या बाजूने मोहनच्या डोक्यावर वार केल्याचे उघड झाले आहे. मात्र, मोहन भुसारी यांच्या घरासमोर रक्ताचा सडा पडलेला होता. परिसरातील काही युवकांनी आरोपीजवळ बंदूक बघितल्याची माहिती पोलिसांना दिली.

घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी

आज सकाळी परिसरातील नागरिकांना गोळी चालल्याचा आवाज आल्याने घराबाहेर धाव घेतली. यावेळी काही युवक मोहनला दुचाकीवर बळजबरीने घेऊन जात असल्याचे दिसले. गोळीबार झाल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिस उपविभागीय अधिकारी व पोलिस निरीक्षक संपत चव्हाण यांनी घटनास्थळी दाखल झाले होते.

(Discussion-on-shooting-in-Sant-Chokhoba-ward-of-Wardha-district)

loading image