विचित्र! वाद सोडवायला गेले आणि मार खाऊन आले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर : मित्रांचे भांडण सोडविणे युवकाला चांगलेच महागात पडले. भांडण करणाऱ्या मित्रांनी आपसातले भांडण सोडून त्याला आणि मित्रांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. यात सात जण जखमी झाले. अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

नागपूर : मित्रांचे भांडण सोडविणे युवकाला चांगलेच महागात पडले. भांडण करणाऱ्या मित्रांनी आपसातले भांडण सोडून त्याला आणि मित्रांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. यात सात जण जखमी झाले. अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भगवाननगर येथे दुर्गा देवीची स्थापना केली आहे. शनिवारी रात्री गरब्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. गौरव राजू वर्मा (28, रा. रामेश्‍वरीनगर, अजनी) हा मित्रासोबत दुचाकी पार्क करण्यासाठी जागा पाहत होते. भगवाननगर ग्राउंडमध्ये गरबा पार्किंगच्या ठिकाणी मॅक्‍स मानकर, सी. एम. लोंढे, सावन मानकर व 2 ते 3 साथीदार आपसामध्ये भांडण करीत होते. गौरव व मित्र भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी सहकारी मित्रांना कॉल करून बोलावून घेतले. गौरवनेही मित्रांना बोलावून घेतले. यावेळी आरोपींनी लाठीकाठीने गौरव वर्मा आणि मित्र सुमित वर्मा, अतुल वर्मा, अनिकेत तायडे, अनिकेत कडू, रवी डेहरिया, पवन पांडे, नयन मेटकर यांना मारून जखमी केले. त्यानंतर आरोपी पळून गेले. यामुळे गरबा कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून शोध सुरू केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute had to be costly