कळंब (जि. यवतमाळ) : येथून दहा किलोमीटर अंतरावर राळेगाव रोडवर उमरी गावाजवळ असलेल्या चिंतामणी पेट्रोल पंपावर काम करणारा युवक मयूर गणेश गायधने (रा. आमला) याच्यासोबत हिशेबावरून वाद झाला.
यातून पेट्रोलपंप मालक सचिन डहाके याने मयूरला बेदम मारहाण करून त्याच्या डोक्यावर एअर पिस्टल लावला. हा घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मयूर गायधने हा सकाळी सहा वाजतापासून पेट्रोल पंपावर काम करीत होता. सायंकाळी सहा वाजता त्याला सुटी झाली. त्यावेळी दुसर्या पाळीत कर्तव्यावर आलेल्या प्रमोद नामक युवकाने पदभार सांभाळताना रिडिंग कमी दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.
या वादात मालक सचिन डहाके (रा. वर्धा) याने मयूर गायधने याला शिवीगाळ करून मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याने घरात जाऊन एअर पिस्टल आणून मयुरच्या डोक्यावर रोखली. घाबरून मयूरने सायंकाळी ७:३० वाजता कळंब पोलिस ठाण्यात रिपोर्ट दिला. पोलिस निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी तत्काळ पोलिस पाठवून सचिन डहाके याला पोलिस ठाण्यात आणून एअर पिस्टन ताब्यात घेऊन सचिन डहाकेवर आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.