esakal | जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष पाऊणकर यांचा शिवसेनेत प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

मनोहर पाऊणकर

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष पाऊणकर यांचा शिवसेनेत प्रवेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी बुधवारी (ता. 4) मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश घेतला. पाऊणकर हे भद्रावती विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, अचानक त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. लोकसभेसाठीही त्यांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने त्यांनी मतदारसंघात संपर्कही वाढविला होता. मात्र भद्रावती मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली. त्यात ते विजयी झाले. धानोरकर आता आपल्या पत्नीला रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पाऊणकर यांनी पक्षबदल करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. येत्या निवडणुकीत ते शिवसेनेकडून मैदानात राहू शकतात. राज्यात सर्वत्र पक्षप्रवेशाचे पीक उगवले असताना आता चंद्रपुरातील पाऊणकर या ज्येष्ठ कॉंग्रेसी नेत्याने शिवसेनेचे शिवबंधन बांधले आहे.

loading image
go to top