Collector Vikas Mina
sakal
यवतमाळ - जिल्ह्यात डिझेल टंचाईच्या चर्चांना उधाण आले असताना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बुधवारी (ता. 27) शहरातील प्रमुख पेट्रोल पंपांवर अचानक पाहणी केली. पंपावरील इंधन साठा आणि वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला. शेतकर्यांना कोणत्याही परिस्थितीत डिझेलसाठी वणवण फिरावे लागू नये, यासाठी पेट्रोल पंप चालकांना स्पष्ट शब्दांत सूचना देण्यात आल्या.