जिल्हाध्यक्ष पदासाठी भारिपमध्ये होती चुरस

जीवन सोनटक्के 
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

अकोला : भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्ह्यातील बड्या पदाधिकाऱ्यांमध्ये चुरस होती. परंतु, त्या सर्वांना बाजूला सारून पक्षाचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रदीप वानखडे यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ घातली. या निर्णयामुळे इच्छुकांच्या आकांक्षेवर पाणी फेरले आहे. जिल्हा कार्यकारिणीसाठी पक्षातील विविध पदांसाठी 350 अर्ज आले होते. त्यासाठी दोन दिवस सतत मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. जिल्हा व शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्यानंतर पक्षामध्ये नवीन कार्यकारिणी लवकरच तयार होईल, यावर चांगलीच चर्चा रंगली होती.

अकोला : भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्ह्यातील बड्या पदाधिकाऱ्यांमध्ये चुरस होती. परंतु, त्या सर्वांना बाजूला सारून पक्षाचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रदीप वानखडे यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ घातली. या निर्णयामुळे इच्छुकांच्या आकांक्षेवर पाणी फेरले आहे. जिल्हा कार्यकारिणीसाठी पक्षातील विविध पदांसाठी 350 अर्ज आले होते. त्यासाठी दोन दिवस सतत मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. जिल्हा व शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्यानंतर पक्षामध्ये नवीन कार्यकारिणी लवकरच तयार होईल, यावर चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु, पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष, महासचिवासह इतर पदांसाठीही इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये 350 पदाधिकारी व कार्यकत्यांनी विविध पदांसाठी अर्ज दिले होते.

त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने व इतर पदाधिकाऱ्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखती सतत दोन दिवस सुरू होत्या. मुलाखतीनंतर यादी लवकरच जाहीर होईल, असेही बोलल्या जात होते. परंतु, यादी जाहीर होण्यास बराच वेळ लागला. अकोला जिल्हाध्यक्ष पदासाठी अॅड. संतोष रहाटे, ज्ञानेश्‍वर सुलताने आणि प्रदीप वानखडे यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. त्यासोबतच माजी आमदार हरिदास भदे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकूंद भिरड यांनीही आपली फिल्डींग लावली होती. त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातील काही पदाधिकाऱ्यांनी आपणच जिल्हाध्यक्ष झालो, अशा ऐटीत पक्षात काम करण्यास सुरुवात केली होती. पक्षाच्या आंदोलनात आणि बैठकीमध्ये त्याच पद्धतीनेही ते वागत होते. शेवटी जिल्हाध्यक्षपदी प्रदीप वानखडे यांची नियुक्ती झाल्याने इच्छुकांचा भ्रमनिरास जरी झाला असला तरी नेहमीप्रमाणे पक्षाध्यक्षांचा आदेश मान्य, यानुसारच ते कामाला लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्हा परिषद निवडणुकी आधी यादी जाहीर 

भारिप बहुजन महासंघाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अवघ्या तीन महिन्याआधी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर निवडणुकीची जबाबदारी राहणार आहे. जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व स्थापन करणाऱ्या भारिपला परंपरा राखता येईल का? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पुन्हा 'सोशल इंजिनिअरींग'
या यादीमध्ये सर्वच नवीन चेहऱ्यांना स्थान देण्यात आले. त्यामध्ये जुना चेहरा फक्त प्रसिद्धी प्रमुख डॉ. प्रसन्नजित गवई यांचाच आहे. कुंभी, मुस्लीम, धनगर, बारी, मराठा, आदीवासींसह बौद्ध व मातंग समाजाच्या कार्यकर्त्यालाही स्थान देण्यात आले आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे 'सोशल इंजिनिअरींग' हा प्रयोग या कार्यकारिणीत दिसून येत आहे.
 

Web Title: District President post of BRP in Akola