
बुलडाणा : शासनाच्या हमी केंद्रावर ज्वारी विक्री केलेल्या शेतकऱ्याला बिल अदा करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारीकडून ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. सदर प्रकरणी २५ हजार रुपयांचा पहिली हप्ता घेताना जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन नंदकिशोर टेकाळे व त्याच्या सहकाऱ्यासह आज २३ जुलै रोजी आण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले.