जिल्ह्याला कुपोषणाचा विळखा

file photo
file photo

यवतमाळ : शेतकरी आत्महत्यांनी शापित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील बालकांतील कुपोषणाची समस्या रोखण्यात सरकारला हवे तसे यश आलेले नाही. ही कोवळी पानगळ रोखण्यासाठी शासनाच्या वतीने वर्षाकाठी सुमारे कोट्यवधी रुपये खर्च केला जातो.
महिला व बालकल्याण विभागामार्फत कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. आर्थिकदृष्टया दुर्बल घटक आणि आदिवासी पाड्यांवरील 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांचे पोषण व्हावे, भुकेच्यावेळी त्यांच्या पोटात सकस आहार जावा, यासाठी केंद्र सरकार अंगणवाडी केंद्रांमधून दोन वेळेचा आहार पुरविते. यात सकाळी अल्पोपहार व घरपोच जेवण दिले जाते. अल्पपोहारात विविध कडधान्यांच्या समावेश असतो. तर जेवणात खिचडीचा समावेश असतो. मात्र, जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचे एकूण 5 हजार 292 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 4 हजार 895 कार्यरत आहेत. तर 397 पदे अद्याप रिक्त आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांपर्यंत वेळेत सकस आहार पोचत नाही. कुपोषित बालकांचे प्रमाण रोखण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाची फौज तैनात आहे. तरी देखील शासनाच्या योजना पाहिजे त्याप्रमाणात ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील कुपोषण बालकांचे प्रमाण कमी करायचे असेल आता शासनस्तरावरून ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. तसेच जिल्ह्यातील कुपोषण रोखण्यात प्रशासनाला बऱ्यापैकी यशसुद्धा आले आहे. शासनाच्या योजना ग्रामीण भागातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल याकडे शासन लक्ष देत आहे.
-विशाल जाधव
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग
जिल्हा परिषद, यवतमाळ

सामाजिक संघटनाही उदासीन
जिल्ह्यात विविध सामाजिक संघटना कार्यरत आहेत. त्या चांगले कामदेखील करत आहेत. मात्र, मुंबई, पुणे या भागातील संघटना कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी जनजागृती करते, तसेच इतर विविध उपक्रम राबविते. त्यासारखे कार्य येथे व्हावे, यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

कुपोषणाची कारणे
1) गरोदर व स्तनदा मातांचे आरोग्याकडे दुर्लक्ष.
2) प्रसूतीदरम्यान योग्य उपचार न मिळणे.
3) मातेला व बाळाचा सकस आहार न मिळणे
4) आदिवासी पाड्यांवर, ग्रामीण भागापर्यंत आरोग्यसेवा पोहोचत नाही.

घ्यावयाची काळी
1) बाळाचा जन्म झाल्यानंतर एक तासात त्याला आईचे दूध दिले पाहिजे.
2) बाळाला सहा महिन्यांपर्यंत आईच्या दुधाशिवाय दुसरे काहीही देऊ नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com