शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

पारशिवनी(जि.नागपूर) : दिवाळीसारखा सण जवळ आला दिसून शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल, अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. सोयाबीन हे नगदी पीक असून या भागातील सोयाबीन अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात आले नसून शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाच्या पेऱ्यात तीन वर्षांपासून घट होत आहे. 

मागील दोन वर्षांआधी 2200 हेक्‍टर तर मागील वर्षी तेराशे हेक्‍टरमध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. यावर्षी 768 हेक्‍टरमध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. पण सोयाबीनचे पीक अजून तरी शेतकऱ्यांच्या हाती आले नसून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत निराशा पसरली आहे. कापसाचे पीकही आताच हाती येणार नसल्याने शेतकरी दिवाळी साजरी करू शकणार नाही. उत्पन्न बाजार समितीत अजूनपर्यंत सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे बाजार समिती ओस पडली आहे. शासनाचा हमीभाव 3710 रुपये असून खुल्या बाजारात या सोयाबीनलर 2800 रुपये ते 3300 रुपयांपर्यंत भाव दिला जात आहे. 
यावेळी अजूनपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचे सोयाबीन न आल्याने खरेदीला सुरुवात केली नाही. लवकरच खरेदीला सुरवात होईल. दिवाळीआधी सोयाबीन बाजार समितीत आले तर शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही. 
अशोक चिखले 
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, 
पारशिवनी 
पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने या भागातील सोयाबीन पीक अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या हाती येऊ शकले नाही. पण सोयाबीन पिकावर कुठलाही प्रादुर्भाव नसून सोयाबीन पिकाचे उत्पादन अधिक होण्याची अपेक्षा आहे. एकरी सात ते आठ क्‍विंटल सोयाबीन शेतकऱ्यांना होईल, ही अपेक्षा आहे. 
गणेश वाघ 
कृषी अधिकारी, पारशिवनी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Diwali of the farmers in the dark