esakal | ...तर ड्युटीवर येणार नाहीत डॉक्टर आणि नर्स
sakal

बोलून बातमी शोधा

Doctor, nurse refuses to come to work at Akola

कोरोनाविरुद्धची जंग लढताना डॉक्टर सुरक्षित तर समाज सुरक्षित ही बाब लक्षात घेता वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, अधिपरीचारिका यांचे संरक्षण होणे अतिशय गरजेचे आहे. मात्र शासनाच्या नियमानुसार त्यांना बचावात्मक संरक्षण पीपीई कीट अद्यापही पुरवली जात नसल्याचे पुढे आले आहे.

...तर ड्युटीवर येणार नाहीत डॉक्टर आणि नर्स

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूपासून बचावासाठी आवश्यक असणारी पीपीई कीट उपलब्ध करून द्यावी अन्यथा कर्तव्यावरच येणार नाही, असा गंभीर इशारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टर तथा नर्स यांनी अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांना बुधवारी (ता.25) भेटून दिल्याची माहिती आहे. त्यामूळे पीपीईकीटचा मुद्दा तापल्याचे पुढे आले आहे.


कोरोनाविरुद्धची जंग लढताना डॉक्टर सुरक्षित तर समाज सुरक्षित ही बाब लक्षात घेता वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, अधिपरीचारिका यांचे संरक्षण होणे अतिशय गरजेचे आहे. मात्र शासनाच्या नियमानुसार त्यांना बचावात्मक संरक्षण पीपीई कीट अद्यापही पुरवली जात नसल्याचे पुढे आले आहे. एचआयव्हीच्या कीटवर काम भागविले जात आहे. त्यामुळे बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या निवासी डॉक्टरांनी तथा नर्स यांनी अधिष्ठाता डॉ.शिवहरी व्ही.घोरडपडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे यासंदर्भात कैफियत मांडली. कीट जर पुरेश्‍याप्रमाणात पुरविल्या गेल्या नाही तर कर्तव्यावरच येणार नाही असा इशाराही त्यांनी अधिष्ठाता डॉ.घोरपडे यांच्याकडे दिल्याची माहिती आहे.

निवासी डॉक्टर तथा नर्स यांनी भेट घेऊन पीपीई कीट आवश्यक त्या प्रमाणात पुरविण्याची मागणी केली. लवकरच त्यांना कीट उपलब्ध करून दिल्या जातील.
-डॉ.शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

सुरक्षा कीट पुरेशा प्रमाणात देण्यात याव्या, अशी मागणी डीन यांच्याकडे भेटून करण्यात आली आहे.
-वंदना डांबरे, सिस्टर, जीएमसी, अकोला