
आष्टी : घरगुती वादातून झालेल्या भांडणात मुलाने वडीलाचा खून केल्याची धक्कादायक घटना आष्टी येथे पोलिस तपासात उघडकीस आली. रेवनाथ लक्ष्मण कोडापे (वय ५५) रा. मार्कंडा देव यांच्या खुनाचे रहस्य अवघ्या ४८ तासात उलगडत पोलिसांनी त्यांचा मुलगा आकाश कोडापे याला अटक केली आहे.