Amravati News : यांत्रिक युगात गाढवे होताहेत हद्दपार; खर्च परवडत नसल्याने पालनपोषणही अवघड
Donkey Decline : गावागावांतील गाढवांचा वापर आता लोप पावत चालला आहे. यांत्रिकीकरणामुळे ओझे वाहून नेणाऱ्या गाढवांची संख्या कमी झाली असून त्यांचे पालनही खर्चिक झाले आहे. पूर्वी शेती, माती, जंगलातील वाहतूक यासाठी गाढव उपयोगी ठरत होते, पण आता ही परंपरा हद्दपार होत आहे.
अमरावती : सध्याचे यांत्रिक युग असल्यामुळे यांत्रिकीकरणाचा परिणाम गाढव पालन करणाऱ्यांच्या व्यवसायावरही झाला आहे. परिणाम ओझे वाहून नेणाऱ्या गाढवांची संख्या सातत्याने कमी होत आहे.